मृतदेहांची वाहतूक करणाऱ्या ‘त्या’ चालकाचा पोलिसांकडून सन्मान

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – कुठलीही आर्थिक अपेक्षा न ठेवता मृतदेहाची वाहतूक करणारा पिकअप गाडी मालक वासुदेव देविदास बागुल (पाटील) यांचा पीआय सुनिल भाबड यांनी सन्मान केला.

येथील वाहन चालक वासुदेव पाटील यांचा पिकअपवरुन माल ने आण करण्याचा व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ते मदतीसाठी नेहमी हात पुढे देतात.तसेच बर्‍याच वेळेस बेवारस प्रेत ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी देखील ते पोलिसांना मदत करतात. म्हणूनच शिंदखेडा पोलीसांनी दखल घेवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक दीपक चौधरी, कॉन्स्टेबल कैलास महाजन आदी उपस्थितीत होते. पीआय भाबड यांनी त्यांचा सन्मान केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here