गुंड ? छे छे .. हे तर सामान्यांचे रक्षणकर्ते.

(यशवंत चव्हाण सीबीडी,बेलापूर)
हे काय चाललंय समाजात ? पूर्वीही सामान्यांची,गरजवतांची लूटमार,फसवणूक,अडवणूक ह्या गोष्टी सर्रास चालू होत्या.शैक्षणिक असो,हॉस्पिटल असो,सरकारी अधिकाऱ्यांची दंडेलशाही असो,अश्या अनेक मानसिक शारीरिक त्रासांना सर्व सामान्य जनतेला यातना भोगाव्या लागल्या आहेत.सरकारी वेळखाऊ यंत्रणेवर विश्वास नाही.अश्या प्रसंगात सामान्य जनता न्याय मिळेल ह्या आशेने समाजातील सर्व सामान्यांना न्याय देण्याचे काम करणाऱ्या मुंबईत नितीन नांदगावकर,ठाणे कल्याण येथील अविनाश जाधव,खारघरचे प्रसाद परब आणि अन्य न्याय देणाऱ्या विभूतींकडे आशेने जातात.त्यांची न्याय बाजू ऐकून हे असे महारथी कायद्याची पर्वा न करता संबंधित अन्याय करणार्यांना समजावून अथवा दंडेलशाही करून अन्यायग्रस्त जनतेला न्याय देण्यास भाग पडतात.कायदा हातात घेतला म्हणून त्यांच्यावर केसेस दाखल होतात.सामान्य जनता ह्यांच्याकडे का जाते ह्याच आत्मपरीक्षण प्रशासनाने करावयास हवे.कोरोना काळात कोण कधी गचकेल ह्याचा नेम नाही तरी काही हॉस्पिटल्स,शैक्षणिक संस्था,प्रशासकीय यंत्रणा व अन्य संधीसाधू लोक जमेल तसे जनतेची घाबरवून आर्थिक लूट करत आहेत ” ऐक मेका साहाय्य करू अवघे लुटू गरजवंत” हा प्रकार सर्व मीडियामधून पाहावयास मिळतो त्याला आळा घालण्याचं काम ह्या समाजाभिमुख समाजरत्न विभूती करतात हे काही जणांना पटत नसलं तरी भूषणावह आहे.असे सामाजिक बांधिलकी जपणारे रत्ने आहेत म्हणून सामान्य जनतेला न्याय मिळतो हे विसरून चालणार नाही.हे समाजरत्न काहीही चुकीचे करत नाही तरी सरकारने ह्यांच्यावर लादलेल्या सर्व केसेस तातडीने मागे घ्याव्यात.समाजातील संधीसाधू भूजंगांसाठी अश्या अनेक समाजरत्नांची गरज आहे.सरकारला शक्य नाही पण सामाजिक संस्थेने अश्या विभूतींचा “समाजरत्न” म्हणून यथोचित गौरव करून सन्मान केला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here