बांगलादेशात मालवाहू जहाजाला प्रवासी जहाजाची धडक; २७ जणांचा मृत्यू

  • राजधानी ढाकापासून १६ किमी अंतरावरील नारायणगंज जिल्ह्यात अपघात
  • १०० हून अधिक प्रवासी असलेले जहाज बुडाले

ढाक्का (बांगलादेश) – शीतलाख्या नदीमध्ये एक लहान प्रवासी जहाज आणि मालवाहू जहाजामध्ये धडक झाली. या अपघातात २७ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. नारायणगंज जिल्ह्यात रविवारी रात्री ही घटना घडली. ढाका ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी पाच मृतदेह आढळून आले. तर, सोमवारी नौदल, तटरक्षक दल, अग्निशमन दल आणि पोलिसांना २१ मृतदेह आढळून आले. या प्रवासी जहाजाचत १०० हून अधिक प्रवासी होते.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुशीगंज येथील शीतलाख्या नदीत सय्यदपूर कोयला जवळ प्रवासी जहाज ‘एमएल सबीत अल हसन’ आणि मालवाहू जहाज एसकेएल-३ मध्ये अपघात झाला. या अपघातानंतर प्रवासी जहाजाला जलसमाधी मिळाली. तर, मालवाहू जहाज घटनास्थळीवरून फरार झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नारायणगंजचे उपायुक्त मुस्तैन बिला यांनी सांगितले की, या घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त जिल्हा मॅजिस्ट्रेट यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना २५ हजार टका (बांगलादेशी चलन) नुकसानभरपाई म्हणून देण्यात आली आहे. बांगलादेशच्या आंतरदेशीय जल परिवहन प्राधिकरणाने या घटनेच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here