मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर)–कोरोनाचा सर्वत्र उडालेला हाहाकार, वाढती रुग्णसंख्या आणि कमी पडणारा रक्तपुरवठा यावर उपाययोजना म्हणून सिद्धिविनायक मंदिर न्यास व शिवसेनेने रक्त संकलनाचा निश्चय केला आहे.
कोरोना भीतीदायक पद्धतीने एकीकडे वाढत असतानाच दुसरीकडे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सिद्धिविनायक न्यास आणि शिवसेनेने संयुक्तरीत्या रक्त संकलनाचे कार्य करण्याचा निश्चय केला आहे.
मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना शाखाना रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.






