पल्सरच्या टाकीतून पेट्रोल ऐवजी निघाले १५ लाख रुपये; चोराच्या आयडियाच्या कल्पनेने पोलिसही चक्रावले

नवी दिल्ली – देशात काही राज्यांत निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. कोरोनामुळे अनेकांना दररोजचा रोजगार मिळविणे कठीण झाले आहे. अशातच बजाज पल्सर या बाईकच्या टाकीतून पेट्रोल नाही तर ५०० च्या नोटांची बंडले नेताना पोलिसांनी पकडले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला ते समजले नसून सोशल मीडियावर तामिळनाडू, केरळ मधील असल्याचे म्हटले जात आहे.

निवडणुकीचा काळ असल्याने पैशांचे वाटप केले जाते. आचारसंहितेमुळे ठराविक रकमेच्या वर रक्कम सोबत बाळगता येत नाही. तसेच तर न्यायची असेल तर बँकेची स्लिप किंवा उद्योग धंद्याची स्लिप सोबत असावी लागते. परंतू या पठ्ठ्याने पैसे अशा ठिकाणी लपविले होते की या बाईकस्वाराला पकडणाऱ्या त्या चाणाक्ष पोलिसालाही सलाम ठोकाल.

नेहमीप्रमाणे काळ्या रंगाच्या पल्सर बाईकच्या टाकीवर त्या स्मगलरने पॉकेटसारखे कव्हर येते ते घातले होते. त्या कव्हरमध्ये पैसे नव्हते. तर त्या कव्हरच्या आतमध्ये असलेल्या टाकीमध्ये चोरकप्पा बनविण्यात आला होता. हा चोरकप्पा कोणाच्याही लक्षात येणारा नाही. पल्सरचा पेट्रोल टँक इतर बाईकपेक्षा मोठा असतो. जास्त पेट्रोल रहावे यासाठी कंपनीने तो दिलेला आहे. मात्र, या पठ्ठ्याने त्यालाच चोरकप्पा बनविला आहे. या पठ्ठ्याने थोडेथोडके नव्हे तर जवळपास 15 लाखांच्या आसपास 500 रुपयांच्या नोटांची बंडले ठेवली होती.

पोलिसांनी पकडल्यानंतर त्याची ती बाईक पोलीस ठाण्यात नेण्यात आली. आता या स्मगलरचा कारनामा पाहण्य़ासाठी पोलिसांचीच गर्दी झाली. एक बंडल काढले, दुसरे काढले असे करता करता त्याने 25 ते 30 बंडले त्या टाकीतून बाहेर काढली. हे पाहून व्हिडीओ बनविणारे पोलिसही चक्रावले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here