हिंगणघाट येथील दालमिल मधील तुरीची दाळ चोरणाऱ्यास अटक; डी.बी. पथकाची कारवाई

यवतमाळ (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरेशी) – हिंगणघाट येथील दालमिल मधील तुरीची दाळ चोरणाऱ्यास येथील डी.बी. पथकाने अटक केली आहे. दिनांक 04/04/2021 रोजी पोस्टे ला फिर्यादी नामे सुरज महेशकुमार मोटवाणी रा. गुरूनानक वार्ड, हिंगणघाट यांनी रिपोर्ट दिला कि, त्याची आजंती येथे असलेली गोविंद ॲग्रो इन्डस्ट्रिज, दालमिल मध्ये ठेवलेल्या तुरीच्या दाळीचे 50 किलो चे 25 चुंगडया एकुण किमंत 1,25,000 रू चा माल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला आहे. अशा तक्रारीवरून पोस्टे ला अप क्र. 340/2021 कलम 380 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हा दाखल होताच पोस्टे हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रथक प्रमुख पो.हवा. शेखर डोंगरे व त्यांच्या पथकासह हिंगणघाट शहर व लगतचे परिसरात सतत माहीती काढुन आरोपी व चोरीस गेलेल्या मालाबाबत शोध घेतला असता, फिर्यादीच्या दालमिल मध्ये काम करणारे लेबर यांची कसुन चौकशी केली असता तपासात निष्पन्न झाले कि, फिर्यादीचे दालमिल येथुन दालमिल मधील मजुर मागील काही दिवसापासुन हिंगणघाट येथील काही लोकांच्या संपर्कात येवुन दाळीची विक्री करीत आहे. त्याबाबत तपास केला असता दालमिल येथील मजुर (आरोपी) नामे 1) शिवनंन्दी हरीप्रसाद कनोजिया वय 20 वर्षे रा. छिंदवाडा, मध्य प्रदेश 2) रवि एकनाथ माहुरे वय 26 वर्षे रा. चंद्रपुर व त्याचे सोबत हिंगणघाट येथे राहणारा वाहन चालक/मालक नामे 3) प्रज्वल अशोक पितळे वय 20 वर्षे रा. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट यांनी संगणमत करून दालमिल येथुन तुरीच्या दाळीची चोरी केल्याने त्यांना अटक करून त्यांचा पि.सि.आर घेण्यात आला.

पि.सि.आर. मध्ये तपासात निष्पन्न झाले कि, त्यांनी यापुर्वी सुद्धा दोन वेळा तुरीच्या दाळीची चोरी केली आहे असे उघड झाले. तसेच तीनही अटक आरोपी हे दालमिल येथन तरीच्या दाळीची चोरी करून हिंगणघाट येथे राहणारा आरोपी क्र.4) शेर अली सय्यद वय 34 वर्षे रा. हिंगणघाट यास विकली आहे. त्यावरून चोरीची दाळ विकत घेणारा आरोपी क्र यास गुन्हयात अटक करून यातील चारही आरोपीतांकडुन गुन्हयात चोरीस गेलेला संपुर्ण माल एकुण 37 तुरीच्या दाळीच्या चंगुडया व गुन्हयात वापरलेली झायलो वाहन क्र. एम.एच. 48-ए.-4686 व टाटा एस वाहन क्र. एम. एच. 32- क्यु. 3684 असा जु.कि. 6,35,000 रू चा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. संपत चव्हाण, स.पो. नि. पि.आर. पाटणकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here