धावत्या गाड्यांमध्ये प्रवाशांना लुटणारे चार आरोपी गजाआड

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – रात्रीच्या वेळी प्रवाशांना गाडीत बसून मारहाण आणि लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पोलिसांनी छडा लावला आहे. या चारही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्या ताब्यातून धारदार शस्त्र तसेच मोबाईल असा एकूण 4 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली.

राभम भागाजी बुगे (रा. बुगवाडी, ता. पारनेर) व साथीदार विनोद सुधाकर पाटोळे (रा. बहिरवाडी, जेऊर, ता. नगर) आकाश संतोष नायकी, (रा.जामगांव, ता.पारनेर) अशी या आरोपींची नावे आहेत. सांगळे यांना 2 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एका कारमध्ये माळीवाडा बसस्थानक येथून प्रवासी म्हणून वसवून निमगाव वाघा शिवार येथे नेऊन त्यांच्यावर लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम व कागदपत्रे बळजबरीने काढून घेतले. 4 एप्रिल रोजी याबाबत सांगळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

गुन्ह्याकरिता वापरलेली होंडासिटी कार आणि आरोपी हे पारनेर व जामगाव परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. हे आरोपी नेप्तीरोडने येणार असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा लावून त्यांना मोठ्या शिताफीने पकडले. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

तसेच त्यांच्याकडून एक होन्डासिटी कार, लोखंडी रॉड, कोयता, तीन मोबाईल फोन असे 4,15,000 रु. किमतीचा ऐवज जप्त केला आहे. या आरोपींनी एमआयडीसी आणि नगर तालुका पोलीस स्थानक परिसरात गुन्हा केल्याचे मान्य केले आहे. पोलिसांनी या आरोपींवर भादंवि कलमांअतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी राभम भागाजी बुगे याच्यावर मुंबई, नगर अशा विविध ठिकाणी केलेल्या एकूण 22 गुन्हे दाखल आहेत. विनोद सुधाकर पाटोळे याच्यावर 13 गुन्हे, तर आकाश संतोष नायकी याच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत. सर्व गुन्हे चोरीसंदर्भातील आहेत. या सर्व गुन्ह्यांबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर व गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार, पोना गणेश धोत्रे, पोना विष्णु भागवत, पोना नितीन शिंदे, पोना शाहीद शेख करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here