ऑनलाईन शिक्षणासाठी मिळालेल्या मोबाईलमध्ये अकरा वर्षांच्या मुलीने बनविला अश्लील व्हिडिओ

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांनी मुलीला मोबाईल घेऊन दिला. मात्र मुलीने अश्लील व्हिडीओ बनवून समाज मध्यमावरील मित्राला पाठविल्याचे समोर आले आहे.

पिंपरी चिंचवड मधील एका अकरा वर्षाच्या मुलीला ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांनी मोबाईल घेऊन दिला. वडिलांनी सहज मोबाईल पाहिला असता तिच्या मोबाईलवर तिचाच अश्लील व्हिडीओ दिसला. या बाबत मुलीला विचारले असता समाज माध्यमावरील मित्राने व्हिडीओ पाठविण्यासाठी धमकी दिल्याचे सांगितले. तसेच व्हिडीओ न पाठविल्यास घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वडिलांनी सायबर सेलकडे धाव घेतली.

पोलिसांनी मुलीच्या मोबाईलची तपासणी केली. तिने एका व्यक्तीला अश्लील व्हिडीओ पाठविल्याचे समोर आले. तसेच तिने समाज माध्यमावर अश्लील संभाषण केल्याचे पोलिसांना आढळले. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिशाभूल केल्याचे दिसून आले.

सायबर सेलचे पोलीस निरीक्षक संजय तुंगार म्हणाले, संबंधित मुलीने अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठविला आहे. तसेच समाज माध्यमावर अश्लील संभाषण केल्याचे समोर आले आहे. समाज माध्यमावरील मित्राला काही पैसे दिल्याचे सांगितले आहे. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here