केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट – राहुल गांधी

नवी दिल्ली – देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अॅलर्जी असून पेंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचा घणाघात राहुल गांधी यांनी शनिवारी ट्विटरवरून केला.

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून रुग्णसंख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. त्यातच अनेक राज्यांत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून यावरून राहुल गांधी पेंद्र सरकारवर ट्विटरवरून निशाणा साधला. देशात कोरोनाची भयंकर अशी दुसरी लाट आली असून स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतत आहेत. सर्वसामान्यांचे जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणेदेखील अत्यंत आवश्यक आहे, मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अॅलर्जी असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

देशात 75 टक्के लोकांना लस देण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागला. त्यामुळे देशात एवढय़ा संथगतीने लसीकरण सुरू असल्याची टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली. देश महामारीच्या दुसऱया लाटेशी लढत असताना शास्त्र्ाज्ञ आणि डॉक्टरांनी मिळून देशातील कोरोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मोठय़ा कष्टाने लस तयार केली खरी, पण लसीकरणाची अंमलबजावणी योग्यरीत्या केली नसल्याचा घणाघात यावेळी राहुल गांधी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच देशात लसींचा उत्सव साजरा करण्याची घोषणा केली होती. यावरून राहुल गांधी यांनी मोदींवर थेट टीकास्त्र् सोडले असून कोरोनाचे संकट असताना लसीची कमतरता ही गंभीर समस्या उद्भवली आहे. अशा वेळी लसींचा उत्सव कसा करायचा, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर लसींची निर्यात थांबवावी, अशी मागणीदेखील त्यांनी पुन्हा एकदा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here