पाटणा (बिहार) – कोरोनाने मृत्यू झालेल्या वडिलांचा मृतदेह स्वीकारण्यास मुलानेच नकार दिल्याची घटना बिहारमधील दरभंगामध्ये घडली आहे. शेवटी एका मुस्लीम तरुणाने त्या पित्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेत
दरभंगामध्ये असणाऱ्या DMCH रुग्णालयाने संबंधित मृत व्यक्तीच्या मुलाला त्यांच्या मृत्यूबद्दल कळवले, पण मुलाने मोबाइलच बंद केला. त्याने कोरोनाच्या भीतीपोटी वडिलांचा मृतदेह घेण्यास नकार दिला. शेवटी कबीर संस्थानने पुढाकार घेत या व्यक्तिचा मृतदेह ताब्यात घेतला. कबीर संस्थेमध्ये असणाऱ्या एका मुस्लीम तरुणाने हिंदू पद्धतीप्रमाणे या वृद्ध व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले आहेत.
मुलाने रुग्णालय प्रशासनाला एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्याने मृतदेह नेण्यासाठी त्याच्याकडे माणसं नाहीत, असं म्हटलं होतं. यानंतर मुलाने त्याचा फोन बंद ठेवला होता. संबंधित मृत व्यक्ती कमतौल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पीडारुच गावातील आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे. मात्र एक मुलगा सोडल्यास सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह होते.






