ब्रिटनने रोखले पाकिस्तानी प्रवासी; पाकिस्तानातील विमानतळावर गोंधळाची स्थिती

पेशावर (पाकिस्तान) – ब्रिटनने पाकिस्तानी प्रवाशांना रोखण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे पाकिस्तानातील विमानतळांवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. करोनाच्या कठोर उपाय योजनांचा भाग म्हणून ब्रिटनने पाकिस्तानातील प्रवाशांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पाकिस्तानातून ब्रिटनला जायला निघालेले प्रवासी विमानतळांवरच अडकून पडले आहेत.

त्यामुळे या प्रवाशांनी विमानतळांवर गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. या प्रवाशांनी आता ब्रिटनला जाण्यासाठी चक्क मालवाहू विमानांची मागणी करायला सुरुवात केली आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून ही मागणीही मान्य होत नसल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.

अनिवार्यपणे हॉटेलमध्ये अलगीकरण टाळण्यासाठी हजारो प्रवाश्‍यांनी ब्रिटनमधून घरी जायचा प्रस्ताव स्वीकारला आहे. शुक्रवारी पहाटे 4 वाजतानाची मुदत चुकलेल्या प्रवाशांना सक्‍तीने हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येत होते. त्याऐवजी प्रवाशांनी परत पाकिस्तानात जायचा प्रस्ताव निवडला. तर पाकिस्तानातून ब्रिटनला यायला निघालेले प्रवासीही पाकिस्तानातील विमानतळांवर जमा झाल्याने विमानतळांवर अभूतपूर्व गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here