- पनवेल शहर पोलिसांची कारवाई : 43 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – मिक्स ईन्डस्ट्रीयल हायड्रोकेमीकल ऑईलची चोरी करुन अपहार करणाऱ्या ५ ट्रान्सपोर्टचे कंपनीचे मालकांना व एका चालकास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास 43 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
फिर्यादी यांच्या हस्थी केमीकल , तळोजा कंपनीचा मिक्स इंडस्ट्रीयल हायड्रोकार्बन ऑईलचा टॅंक सुनिल ट्रान्सपोर्टचे ट्रक क . एम.एच .४६ एफ ५२२८ वरील चालक प्रल्हाद गोरख गर्जे याचे ताब्यात पोच करण्यासाठी दिला असता त्याने व त्याचे साथीदार यांनी आपसात संगन्मत करून रात्रौ ०१:३० वाजण्याचे सूमारास निलेश ढाब्या जवळ , पळस्पे , पनवेल येथे सदर टॅन्कमधील ११,६०० / – रूपये किमतीचे अंदाजे २०० लीटर ऑईल चोरी करुन लोखंडी पिंपामध्ये काढुन अपहार केला होता . सदर ठिकाणी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हेप्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी छापा मारला असता सदर आरोपीत हे पळुन गेले होते . म्हणुन फिर्यादी यांच्या तकारीवरुन गु.रजि नंबर । २१८ / २०२१ भा.द.वि. कलम ४०७ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस आयुक्त बीपिन कुमार सिंह , पोलीस सहआयुक्त डॉ.जय जाधव , अपर पोलीस आयुक्त डॉ . बी . जी . शेखर पाटील , पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील व सहा . पोलीस आयुक्त , नितीन भोसले – पाटील यांनी विशेष प्रयत्न करुन आरोपी अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने वपोनि अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गोपनिय बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे सदर गुन्हयातील पाहीजे आरोपीत चालक प्रल्हाद गोरख गर्जे व त्याचे पाच साथीदार ( ट्रान्सपोर्ट मालक ) यांना अटक केली आहे.
अटक आरोपीत हे वेगवेगळया ५ ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक असुन त्यांच्या कोणात्याही ट्रान्सपोर्ट कंपनीला “ मिक्स इंडस्ट्रीयल हायड्रोकार्बन ऑईलचा ” टॅन्क पोहोच करण्यासाठी भाडे मिळाल्यास सदर आरोपीत ” मिक्स इंडस्ट्रीयल हायड्रोकार्बन ऑईल ” टॅन्कचे सिल न तोडता सिलचे बाजुलचे नट बोल्ट पान्याने खोलुन झाकण ओपन करुन त्यामध्ये पाईप टाकुन सदर ऑईलची चोरी करतात व आप आपसात ऑईल वाटुन घेतात . सदर ऑईल त्यांचे ट्रान्सपोर्टचे ट्रकमध्ये इंधन म्हणुन वापरतात . सदर ऑईल टॅन्कचे वजन मॅनेज करण्याठी जेवढे ऑईल चोरी केले तेवढे पाणी मिक्स करतात असे तपासात निष्पन्न झाले आहे .

यासाठी पोलिस उपनिरीक्षक तपास अधिकारी – सुनिल तारमळे व त्यांच्या पथकाने आरोपींची नावे प्रल्हाद गोरख गर्जे , वय ३६ , धंदा – चालक सुनिल ट्रान्सपोट सुनिल महादेव वनवे , वय ३० वर्ष , धंदा- मालक सुनिल ट्रान्सपोर्ट , नवीन पनवेल संपत गोरख पालवे , वय ३३ वर्ष , धंदा – मालक प्रथमेश ट्रान्सपोर्ट , पनवेल , शिवाजी महादेव इंगवले , वय ३५ वर्षे धंदा – मालक शुभम ट्रान्सपोर्ट , नवीन पनवेल , काकासाहेब भिमराव नागरगोजे , वय ३६ वर्षे , धंदा – मालक दिपक ट्रान्सलाईन्स , नवीन पनवेल शाहदेव उर्फ बाप सुखदेव पालवे , वय ४४ वर्ष , धंदा मालक – विशाल ट्रान्सपोर्ट , कामोठे यांना अटक केली आहे व त्यांच्याकडून हस्तगत माल . २४,८८,०० / -रू . किचा ट्रक क.एम एच .४६ एफ ५२२८ त्यावर मिक्स इंडस्ट्रीयल हायड्रोकार्बन ऑईलचा टॅन्क ११,६०० / -रू किंचे एक लोखंडी पिंप त्यामध्ये अंदाजे २०० लीटर मिक्स इंडस्ट्रीयल हायड्रोकार्बन ऑईल . ३,००० / – रू . किचा १ प्लास्टीक पाईप , ३ पाने , ४ लोखंडी पिंप . ८,००,०० / – रू.कि.ची पांढ – या रंगाची ब्रिझा कार कमांक एम एच १२ पी एफ ०१२१ ८,००,००० / – रू.कि.ची रू.कि.ची ग्रे रंगाची ब्रिझा कार कमांक एम एच ४७ क्यु ८३१६ ५०,००० / – रू.किं.ची काळया रंगाची सी बी शाईन मोटार सायकल क . एम एच ०३ बी एम ९९ ५५ ५०,००० / – रू.किं.चीकाळया रंगाची बजाज डिसकव्हर मोटार सायकल क . एम एच २३ ए ए ४६७ ९ ७७,००० / – रू.कि.चे ५ मोबाईल फोन ४२.८,००० / – असा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पनवेल शहर पोलीस ठाणेचे वपोनि अजयकुमार लांडगे व पोनि ( गुन्हे ) संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि अनिल देवळे , पोउपनि सुनिल तारमळे , पोहवा रविंद्र राऊत , पोहवा नितीन वाघमार , पोना परेश म्हात्रे , पोशि सुनिल गर्दनमारे , पोशि विवेक पारासर , पोशि यादवराव घुले , पोना विनोद पाटील , पोना पंकज पवार , पोना गणेश चौधरी व पोशि साळुखे यांनी केली आहे .






