जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव येथील प्रभाग क्रमांक ७ मधील लांडगे गल्ली परिसरात जलसेवा व पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात असल्यामुळे अनेक ठिकाणी बोअरवेलला पाणी कमी कमी होत आहे.त्यामुळे लांडगे गल्ली परिसरात बोरवेल मध्ये पाण्याची मोटर टाकून व त्या ठिकाणी पाण्याची टाकी ठेवून उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्याचे हाल होऊ नये यासाठी योगेश प्रकाश पाटील शिवसेनेचे कार्यकर्ते पत्रकार यांनी स्वखर्चाने पाण्याची मोटर,पाण्याची टाकी चे नियोजन केले. तसेच पालकमंत्र्यांच्या सहकार्याने संपूर्ण लांडगे गल्ली परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याचा कामाचासुद्धा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे नागरीकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते.
या प्रसंगी समन्वय समितीचे अध्यक्ष गुलाबराव वाघ,मा नगराध्यक्ष पी एम पाटील सर,नगराध्यक्ष निलेश चौधरी,माळी समाजाचे पंच विजय महाजन,नगरसेविका आराधना पाटील,अहमद पठाण,किरण मराठे,करण वाघरे,अजय चव्हाण,माजी नगराध्यक्ष प्रकाश पाटील,रवींद्र कंखरे,रवींद्र जाधव,कमलेश बोरसे,सतीश बोरसे,महेश पाटील,नगराज पाटील,अशोक देशमुख,योगेश पाटील,नंदकिशोर पाटील,धर्मा पाटील,भारती देशमुख,जिजाबाई पाटील,दीपिका पाटील,अरविंद चौधरी,अमोल चौधरी,कैलास इंगळे आदी मान्यवर लांडगे गल्लीतील नागरिक महिला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.






