बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शहा) – बाजार सावंगीत मागील काही महिन्यापासून बाजार सावंगी पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बाजार सावंगीत दारूचा महापूर वाहत असून बाजार सावंगी हे धंद्याचे माहेरघर बनलेअसून येथे दारू सट्टा मटका जुगार बुटका गांजा अफू वाळूची तस्करी अशा विविध धंद्यांनी ग्रस्त झाला आहे.
या धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिस प्रशासन मूग गिळून बसले आहेत. याचाच फायदा घेऊन अवैध धंदे करणारे त्यांच्याविरोधात बातम्या प्रसिध्द करणाऱ्या पत्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अवैध धंद्यांविरोधात बातम्या देणाऱ्या पत्रकारांनाच खंडणी किंवा इतर खोट्या गुन्ह्याखाली अडकवण्याचे षड्यंत्र सुरू असल्याची गुप्त माहिती सूत्रांमार्फत मिळाली आहे
बाजार सावंगीत खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांना वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून बातम्या देण्यास सुरुवात केली मात्र या नंतर या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याऐवजी बातमी देणार्या पत्रकारावर बातमी प्रसारित न करण्यासाठी विविध राजकीय नेते व गाव गुंडांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणविल्या जाणाऱ्या पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याची तयारी सुरू आहे
जनहितार्थ बातमी प्रसारित करण्याचा पत्रकारांना अधिकार आहे परंतु या अधिकारावर हिटलरशाही पोलीस प्रशासन या माध्यमातून अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे बाजार सावगीत सुरू असलेल्या अवैध दारूचा महापूर व्यवसाय करणाऱ्या कडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण झाल्याशिवाय या अवैध धंद्यांना पोलीस प्रशासन संरक्षण देत आहे काय असा प्रश्न आता जनतेतून निर्माण होत आहे वरिष्ठ अधिकारी मोक्षदा पाटील यांनी या भोगल कारभाराकडे गांभीर्याने लक्ष देणे व अवैध धंदे वाल्या विरुद्ध व पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे कारण स्थानिक पोलिस यंत्रणा अवैध दारू व मटका तसेच अवैध व्यवसायावर कारवाई करण्यास असमर्थ .हतबल निकामी ठरत आहे.
पोलिस प्रशासनाच्या संरक्षणात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा बसेल का अधिकाऱ्याच्या आदेशाची.पायमल्ली करत.सट्टा व्यवसायाला व दारू व्यवसायाला बाजार सावंगी पोलिस हे उघडपणे पाठिंबा देत आहे यांच्यावर कारवाई होणार का? असे प्रश्न परिसरातून उपस्थित होत आहेत.






