मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी. मुंबई यांच्या मार्फत आयोजित, राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन २०२०. कार्यक्रमा अंतर्गत, राज्यातील, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमात साहित्य, पत्रकारीता,शैक्षणिक, मानवाधिकार क्षेत्रात, राज्यातील अनेक सामाजिक संस्थांमार्फत कार्य करणारे उत्प्रेरक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष, नॅशनल फेडरेशन हुमन राईट कांऊसिल, सामाजिक समन्वय समितीचे कवि – साहित्यिक, पत्रकार डॉ. संतोष शिवाजी कांबळे (एस के.जी) यांना राज्यस्तरीय भारतज्योती प्रतिभा सन्मान एक्सलन्स पुरस्कार २०२०. गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
तूर्तास उपरोक्त संस्थांमार्फत सदर पुरस्काराची घोषणा केली आहे. सध्याच्या कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या बिकट परिस्थितीत उपरोक्त कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा संस्थेचा मानस आहे.






