शिरसोली प्र.न. (प्रतिनिधी सिध्दांत सोनवणे) – जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे बहुजनांनी भारतरत्न महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरी राहूनच साजरी करा या प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील सिध्दार्थ मित्र मंडळातर्फे समाज मंदिराचे रंगकाम करण्यात आलं.

डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बहुजनांकडून मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाते. राज्यात प्रत्येक ठिकाणी जयंतीच्या पूर्वसंध्येलाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शहरात असलेल्या समाजमंदिराचे प्रवेशद्वार रंगविण्यात आले.

याकामी सिध्दार्थ मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सोनवणे, किंगबाबा, एकनाथ सोनवणे, महेंद्र तांबे यांनी सहकार्य केले. यावेळी अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी या वर्षी कोरोनामुळे घरातच बसून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जोपासत कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवत घरातच जयंती साजरी करावी. भीम सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी घरातच जयंती साजरी करून नवीन इतिहास रचण्याचे आवाहन सर्व भीमसैनिकांना केले आहे.






