नाशिक (विशेष प्रतिनिधी) – केंद्र सरकारने दोन महीन्यापूर्वी अन्न आणि पुरवठा विभागा अंतर्गत सुरवातीला वी २५ हजार टन मक्याची खरेदी करण्यास केंद्राची परवानगी होती ,परुतुं एकठ्या नाशिकमध्ये त्याच्या पेक्षा अधिक प्रमाणात शेतकंऱ्यानी खरदी केंद्रावर जाऊन प्रत्यक्षात ७० ते ७५ हजार टन मक्याची नोंदणी झाली असल्याने पालक मंत्री छगन भूजबळ व खा भारती पवार यांनी मागील महीन्यात वाढीव ६५ हजार टन मक्या च्या खरेदीस परवानगी घेऊन मका उत्पादकांना दिलासा दिला होता तथापि एकूण ९० हजार टन मक्याची खरेदी करून ही बऱ्याच ठिकाणी नोंदणी केलेला मका अद्यापही शिल्लक राहील्याने मका उत्पादकांनी खा.भारती पवार यांच्या कडे खरेदीची मुदत व साठा वाढवून संपूर्ण नोंदणी केलेल्या मका खरेदी करण्यास यावा म्हणून मागणी केली होती, त्यानुसार केंद्रीय मंत्री रामविलास पासवान व रावसाहेब दानवे यांनी त्वरित दखल घेत वाढीव २५ हजार टन मका खरेदी परवानगी दिली त्या बद्दल कसमादेच्या मका उत्पादकांनी खा .भारती पवार यांचे आभार मानले आहेत व केंद्र सरकारने वेळोवेळी मुदत वाढवून दिली म्हणून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मका हमी भावाने खरेदी झाल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव,संजय निकम यांनी दिली आहे तसेच मका उत्पादक कुबेर जाधव ,संजय निकम ,युवराज वाघ यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Home Uncategorized उर्वरित नोंदणी झालेल्या २५ हजार टन मक्याची खरेदी करण्यास केंद्राची परवानगी; खा...







