पंचशील सामाजिक संस्था व युग पुरुष प्रतिष्ठान यांच्या वतीने रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – बाबासाहेब आंबेडकर जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पंचशील सामाजिक संस्था व युग पुरुष प्रतिष्ठाच्या वतीने १२,१३, १४ एप्रिल रोजी आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पंचशील सामाजिक संस्था व युग पुरुष प्रठिष्ठान च्या अध्यक्ष अजित खताळ यांनी दिली.

१२,१३, १४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २ या वेळेत नेरूळ सेक्टर ६ मधील लोकमान्य समाज मंदीर येथे हे शिबिर आयोजित  केले होते. कोरोना महामारीमुळे राज्यात रक्तसाठा घटत चालला असून रक्त मिळविण्यासाठी रूग्णाच्या नातलगांना धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे या शिबिराचे आयोजन केले असून नेरूळ नोडमधील रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होवून रक्तदान केले असे अजित खताळ यांनी सांगितले.

तसेच या कार्यक्रमा प्रसंगी समाजसेवक प्रल्हाद पाटील,वचिंत बहुजन आघाडी चे माजी जिल्हा अध्यक्ष विरेंद्र लगांडे, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे सचिव विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे. युगपुरुष प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष अजित खताळ, महादेव पवार,प्रशांत सोलस्कर व ईतर सदस्य उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here