भुसावळात तरुणाचा दगडाने ठेचून खून

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – गुढीपाडव्याच्या सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना शहरामध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली. शहरातील समतानगरमध्ये एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप गायकवाड (वय 34) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. आज दुपारी शहरातील लीम्बस क्लब हनुमान मंदिरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत संदीप गायकवाड याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे भुसावळ शहरात दहशीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आई व पत्नी, लहान चिमुकली घटनास्थळी येताच हंबरडा फोडला.

भुसावळ शहरातील चाळीस खोली भागांमध्ये तीस ते पस्तीस वर्षाचा मृतदेह पडले असल्याची माहिती भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे ठोंबे यांना मिळाली. त्या अनुषंगाने त्याठिकाणी जाऊन पाहिले असता 35 वर्षे युवकाचा डोक्यात दगड घालून किंवा तीक्ष्ण हत्याराने वार केल्यामुळे खून झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे इन्चार्ज अर्चित चांडक घटनास्थळी पोहोचले व जळगाव येथून फॉरेन्सिक टीम व डॉग स्कॉड घटनास्थळी तपास करू करत आहे.

मयत इसम हा भुसावळमधील रहिवासी आहे. संदीप गायकवाड याच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने दगड घालून खून केला असावा, असं प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी भुसावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे व पुढील तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांची टीम करत असल्याची माहिती जळगावचे ॲडिशनल एसपी चंद्रकांत गवळी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here