सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये दोन गटांमध्येच फ्रीस्टाइल हाणामारी

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – मारहाणीचा गुन्हा दाखल करत असताना, सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये दोन गटांमध्येच फ्रीस्टाइल हाणामरी झाली. या प्रकरणात रविवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दोन गटात बोरगाव सारवणी (ता.सिल्लोड) येथे झालेल्या मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात जमाव आला होता. सिमेंट रस्ता निकृष्ट होत असल्याच्या कारणावरून काम बंद केल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होता. पोलिस ठाण्याच्या आवारातच त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला आणि हाणामारीला सुरुवात झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करित जमावातील नागरिकांना ताब्यात घेतले.

पोलिस कर्मचारी मुश्ताक युसुफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमजत खान नजीर खान, इसार खान बशीर खान, शेख इरफान शेख बशीर, शेख मुख्तार शेख लड्डू, शेख एजाज शेख लड्डू, शेख इरफान शेख हुसेन, शेख आसिफ शेख नवाब, शेख नईम मोहम्मद अली, याह्याखान बशीरखान, कलीम बिस्मिल्लाखा, उमरखा बशीरखा, जाकेर बशीरखा, मोहसीन युसुफखा, शेख शफी शेख इसा यांचेसह इतर १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here