बिहारच्या आरा येथे दुहेरी हत्याकांड प्रकरणी जमावाने विक्षिप्त तरुणाला जिवंत पेटवले

पाटणा (बिहार) – राज्यातील आरा येथे झुंडबळीची घटना उघडकीस आली आहे. जमावाने बकरी गावात एका विक्षिप्त तरुणाला मारहाण केली. त्यानंतर त्याला जिवंत जाळले. २८ वर्षीय मृत तरूण हा उदवंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्ञानचक गावातील रहिवासी होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरूणाची मानसिक स्थिती ठीक नव्हती. एका वृद्ध व्यक्तीच्या हत्येचा आरोप त्याच्यावर होता. त्या रागातून जमावाने त्या विक्षिप्त तरुणाचा पकडले आणि बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला नंतर जिवंत पेटवून दिले. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यातील पोलीस आणि प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वृद्ध व्यक्ती आणि तरुण अशा दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर ते विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण होते. गावात शांततेचे वातावरण राहावे, यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. गावातील एका वृद्ध व्यक्तीची त्या विक्षिप्त तरुणाने हत्या केल्याचा आरोप होता. मुटूर यादव असे त्या तरुणाचे नाव होते. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, चौधरी हे शेताची राखण करत असताना मुटूर त्या ठिकाणी गेला आणि त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात त्यांचा मृत्यू झाला. हत्येनंतर त्यांचा मृतदेह सुकलेल्या पानांमध्ये झाकून ठेवला आणि नंतर पेटवून दिला. या घटनेची माहिती मिळताच गावकरी त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी तरुणाचे हातपाय बांधले आणि बेदम मारहाण केली. संतापलेल्या जमावाने त्याला जिवंत पेटवून दिले. दोन वर्षांपूर्वी याच तरुणाने आपल्या पत्नीचीही हत्या केल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here