जामनेर (तालुका क्राईम रिपोर्टर दिपक पाटील) – येथे मंगळवारी (दि.१३) मिळालेल्या गुप्त माहितीवरून जामनेर पोलिसांनी गारखेडा शिवारात छापा घालून गावठी दारुच्या भट्टया उध्दवस्त केल्या.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, दुपारी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे जामनेर पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , गारखेडा शिवारातील वाघुर धरणाचे पायथ्याशी दिपक नथ्थु ठाकरे रा.गारखेडा ता.जामनेर हा गावठी दारु तयार करत आहे.
मिळालेल्या माहितीची तात्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी पोहेकॉ . विलास चव्हाण , पोना / हंसराज वाघ , पोकॉ / मनोज धनगर , पोकॉ / तुषार पाटील यांना बोलावून गारखेड़ा शिवारातील वाघुर धरणाचे पायथ्याशी दिपक नथ्थु ठाकरे रा.गारखेडा ता.जामनेर हा गावठी दारु तयार करत असल्साची माहिती मिळाल्याचे सांगून, दर ठिकाणी कारवाईसाठी रवाना केले.
त्यांच्या सूचनेनुसार पोलीस स्टाफ यांनी भारत काकडे उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग , पाचोरा व पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे जामनेर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाने सदर ठिकाणी अचानक छापा टाकला असता तेथे दिपक नथ्थु ठाकरे हा गावठी हातभट्टीची दारु तयार करीत असतांना आढळून आला. कारवाईत या ठिकाणी 6000 हजार रुपये किंमतीचे गुळमिश्रीत कच्चे व पक्के रसायन मिळुन आले. आरोपीवर जामनेर पोलीस स्टेशनला गुरनं .120 / 2021 महा.दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 ( फ ) , ( ब ) , ( क ) , ( ई ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे .






