लखनऊ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसेन) – सोन्याच्या तस्करीसाठी तस्कर काय शक्कल लढवतील याबाबत सांगता येत नाही. लखनौ विमानतळावरून कस्टम अधिकाऱ्यांनी एका 20 वर्षीय विद्यार्थींनीला ताब्यात घेतले.
त्या मुलीची झाडाझडती घेतल्यानंतर पोलिसांना तिच्या अंडरवेअरमधून तब्बल 1 कोटी रुपयांचे सोने सापडले. आतापर्यंत एका महिला प्रवाशाकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी सोन्याची तस्करी होती.
मूळची बंगालची असलेली ही तरुणी दुबईवरून लखनौ विमानतळावर उतरली तेथून ती कोलकाताला जाणार होती. पोलिसांना तिच्यावर संशय आल्यानंतर तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली असता तिच्या अंडरवेअरमधून तब्बल 2318 ग्राम सोन्याची बिस्किटं सापडली. सदर तरुणी लखनौ विमानतळाच्या बाहेर कुणाला तरी ही सोन्याची बिस्कीटं देणार होती. मात्र त्या आधीच तिला अटक झाली.






