ओझर्डे येथील जवान सिक्कीम येथे कर्तव्य बजावताना शहीद

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – ओझर्डे (ता. वाई) येथील सोमनाथ अरविंद तांगडे (वय ३८) हा तरुण सैन्य दलात सिगणल विभागात हवालदार पदावर सिक्कीम येथील कॉलिंग पॉंग मध्ये १० किलो मिटर वर बर्फाच्या टेकडी वर इतर दोघांबरोबर नेमणूकीस होता. पण दिनांक ८ रोजी बर्फाच्या डोंगराळ भागाला वादळी वारा व पावसाने रात्री ३ वाजण्याच्या सुमारास झोडपून काढले.

त्यात त्यांचे तंबू उडुन गेले. त्यामुळे रात्रभर हे तिघेही भिषण थंडीत कुडकुडत बसले. त्यावेळी ओझर्डे तालुका वाई येथील रहिवासी असलेले जवान सोमनाथ अरविंद तांगडे हे चक्कर येऊन तेथील बर्फावर आदळल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी कॉलींग पॉंग येथील बॅरेकपुर येथील मिलिट्री हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली गेली. पण तेव्हापासून ते कोमात गेले व आज दि १६ रोजी त्यांचा ऊपचारा दरम्यानच सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे. त्यांचे शव सिक्कीम वरुन विमानाने पुण्यापर्यंत आणण्यासाठी ओझर्डे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी श्रीमती रेश्मा, मुलगी सिद्धी, (वय १२), परी (वय ८) असे आहेत.

शहीद सोमनाथचे पार्थीव लवकर मिळण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यामार्फत ओझर्डे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या अकस्मित जाण्याने ओझर्डे गावासह वाई तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here