सिगारेट न दिल्याच्या कारणावरुन युवकाला मारहाण

नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – सिगारेट न दिल्याने गुन्हेगाराने युवकाला मारहाण करून त्याच्याकडील रोख हिसकावली. ही घटना लकडगंज पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सुनील हॉटेलसमोर घडली. राहुल सुरेश कोतमवार (वय २९, रा. तेलंगीपुरा) असे जखमीचे नाव आहे.

याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी कुख्यात सनी समुंद्रे (वय ३०, रा. यशोधरानगर) याच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. सनीविरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास राहुल हा सुनील हॉटेलसमोर सिगारेट पित होता. याचवेळी सनी तेथे आला. त्याने राहुलला सिगारेट मागितली. राहुलने नकार दिला. सनीने राहुलला मारहाण केली. त्याच्या खिशातील ४०० रुपये हिसकावून पसार झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here