वर्धा (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरेशी) – कोरोना विषाणूचा प्रसार हा महाराष्ट्रात मोठया प्रमाणात झाला असून वर्धा जिल्ह्यात सुद्धा कोविडच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . सदर विषाणूचा प्रसार रोखण्याकरीता दिनांक १४-०४-२०२१ रोजी रात्री 08.00 वाजे पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , महाराष्ट्र राज्य यांचे आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे . वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरिता 90 पोलिस अधिकारी 700 पोलिस कमर्चारी तसेच 500 होमगार्ड ईतका रटॉप लावन्यात आलेला आहे.. सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. अगदी महत्वाचे काम असल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले



