मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – देशभरासह राज्यात कोरोना बाधितांची झपाट्याने वाढत आहे. दरदिवशी लाखोंच्या संख्येला कोरोना आपल्या विळख्यात अडकवत आहे.
यातच, सोनी वाहिनीवरील सुप्रसिद्ध रिऍलिटी शो ‘इंडियन आयडल’ या शोला ग्रहण लागले असून नुकताच या शोचा एक स्पर्धक पवनदीप राजन हा कोरोनाच्या विळख्यात अडकला होता. आता आणखी एक स्पर्धक म्हणजेच ,मराठमोळा आशिष कुलकर्णी याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. आशिषलाही कोरोना व्हायरसचा फटका बसला असून आशिषला पवनदीपसोबत क्वारंटाईन करण्यात आले आहे.
या आठवड्यात, प्रोटोकॉलनुसार, सर्व स्पर्धकांनी चित्रिकरणापूर्वी कोरोना चाचणी केली आहे. ज्यामध्ये आशिषचा अहवाल सकारात्मक आला आहे. आता तो हॉटेलच्या खोलीतूनच आपले सादरीकरण करेल. त्यामुळे आता शोच्या पुढील भागाचे चित्रीकरण बंद होईल का? असा प्रश्न उपस्थित राहत आहे.






