महिला पोलीस उपनिरीक्षकावर सहाय्यक पोलीस निरीक्षकाकडून तब्बल ८ वर्षे बलात्कार; गुन्हा दाखल

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्यानेच पुरुष पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप शिवाजी पिसे असं सहायक पोलीस निरीक्षकाचं नाव अहे. पिसे कफ परेड पोलीस ठाण्यात एपीआय म्हणून कार्यरत असून गेल्या ८ वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवल्यानंतर गेल्या महिन्यात त्याने अन्य तरुणीशी विवाह केल्याने महिला पोलीस उपनिरीक्षकाने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे.

दोघेही 108 क्रमांकाच्या पीएसआय तुकडीचे अधिकारी आहेत. 2013 मध्ये दोघे डोंगरी पोलीस ठाण्यात नियुक्तीला होते. त्यावेळी पिसे आणि तिचे प्रेमसंबंध जुळून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र त्यानंतर महिला उपनिरीक्षकाची पुण्याला बदली झाली. मात्र दोघंही एकमेंकांच्या संपर्कात होते. डोंगरी पोलिसांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरोधात या प्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. लवकरच पोलिस आरोपीचाही जबाब नोंदवतील. आरोपी मुंबईतील एका पोलिस ठाण्यात तैनात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here