सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – येथील औंध परिसरातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश धनाजी पवार असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत औंध पोलिस ठाण्यामधून मिळालेली माहिती अशी, की संबंधित पीडित मुलीच्या घरी चिकनचे दुकान असल्याने संशयित चिकन खरेदीसाठी येत होता.ता. 13 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता आपली मैत्री आहे आपण फिरून येऊ, असे म्हणत म्हैशाळच्या पुढे कर्नाटक राज्यातील नरबाड येथे मुक्काम केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगेशच्या मित्राच्या घरचे बांधकाम असलेल्या ठिकाणी जबरदस्तीने बलात्कार केल्याची माहिती पीडित मुलीने वडिलांना सांगितल्यानंतर औंध पोलिस ठाण्यात मंगेश धनाजी पवार याच्याविरुद्ध पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.







