सबडिव्हीजन अधिकारी असल्याचे सांगत अनेकांना गंडा घालणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

fruad

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी प्राधिकरणात सबडिव्हीजन अधिकारी असल्याचे सांगत एकाने अनेकांना गंडा घातला आहे. अलिशान मोटारी भाड्याने घेऊन त्यांच्या मालकांना भाडे न देता 11 लाख 60 हजारांची फसवणूक केली आहे. त्याशिवाय रेल्वेत नोकरी लावण्याचे सांगत तरूणांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. तुषार मारूती थिगळे (वय – 28, रा. जुईनगर, सानपाडा, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी नवाज देशमुख (वय – 30, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषारने निगडी प्राधिकरणात सबडिव्हीजन अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र तयार केले होते. त्यानंतर त्याने नवाज देशमुख यांच्याकडील अलिशान मोटारी भाड्याने लावण्याचे सांगत ताब्यात घेतल्या होत्या. त्यानुसार काही दिवस मोटारींचे भाडे देऊन त्यांचा विश्वास संपादित केला. .

मात्र, काही महिन्यानंतर तुषारने नवाज यांना भाडे न देता तब्बल 11 लाख 60 हजारांची फसवणूक केली. त्यानंतर गोकुळ पवार, दादा पठारे, पंकज मोरे यांच्याकडून रक्कम घेऊन जुन्या गाड्या स्वस्तात देतो सांगून फसवणूक केली. तसेच प्रशांत जगताप, विशाल हुलले या दोन तरूणांना रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक केली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here