बुलेटचे चाक पायावरुन गेल्याने तरुणासह कुटूंबास मारहाण

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – बुलेटचे चाक पायावरुन गेल्याने एका तरुणासह त्याच्या कुटूंबास जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सहकारनगर पोलीसांनी स्वप्निल दिपक कदम(28,रा.गुलाबनगर, धनकवडी) याला अटक केली असून त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी संतोष हजारे (29,रा.तानाजीनगर, धनकवडी) हा बुलेट घेऊन रस्त्याने जात असताना त्यास स्वप्निल आडवा आला. यामुळे बुलेटचे चाक त्याच्या पायावरुन गेले. याचा राग मनात धरुन स्वप्निल व त्याच्या साथीदारांना शिवीगाळ करत मारहाण केली.

यानंतर थोड्या वेळाने पुन्हा संतोषवर कोयत्याने वार केले. त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र अरबाजलाही कोयत्याने मारहाण करण्यात आली. यानंतर स्वप्निलच्या भाऊ , पत्नी व आईसही मारहाण करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गुजर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here