मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – देशभारसह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या काही केल्या कमी नाही होत आहे. बॉलिवूड कलाकारांभोवती देखील कोविड-१९ चा विळखा बसला आहे. मागील ४८ तासांत अभिनेता पवन कल्याण, सोनू सूद, मनीष मल्होत्रा, सुमित व्यास यांना कोरोनाची लागण झाली असून आता अभिनेता अर्जुन रामपाल याला देखील कोरोनाची बाधा झाली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्याने ही माहिती दिली. कोणतीही लक्षणं नसूनही त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे अर्जुनने पोस्टमध्ये म्हटले आहे. अर्जुन रामपालने इंस्टाग्राम पोस्टद्वारे लिहिले, “माझी कोविड-19 टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. परंतु, माझ्यात कोणतीही लक्षणं नाहीत. सध्या मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. औषधं देखील घेत आहे. सर्व नियमांचे पालन करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आवश्यक काळजी घ्या. हा अत्यंत कठीण काळ आहे. परंतु, आता आपण जागरुक राहीलो तर त्यातून बाहेर पडू शकतो. एकत्रितपणे आपण कोरोनाला हरवूया.”
— arjun rampal (@rampalarjun) April 17, 2021






