मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – सुरक्षिततेचे ‘स्टिकर’! मुंबई पोलीस दलाचे जवान यांनी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींना वाहनावर लावण्याकरिता ‘स्टिकर’ वितरित केले आहेत. याची माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.
रविवार, दिनांक १८ एप्रिल २०२१ रोजी पासून लाल रंगाचे स्टिकर हे डॉक्टर, वैद्यकीय व्यावसायिक, रुग्णालयातील कर्मचारी, वैद्यकीय उपकरणे कामगार, रुग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा यांच्यासाठी आहे. हिरव्या रंगाचे स्टिकर हे अन्न, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी वस्तू, भाजीपाला विक्रेते कामगार यांच्यासाठी असेल. तर पिवळ्या रंगाचे स्टिकर हे प्रेस, मीडिया, बीएमसी, टेलिफोन विभाग, पोलिस विभाग, लॉकडाऊन मार्गदर्शक सूचनांनुसार सूचीबद्ध सर्व अत्यावश्यक सेवा हे पिवळ्या रंगाचे स्टिकर अंतर्गत आहेत.
आपण हे स्टिकर स्वत: च्या घरात बनवू शकतो. किंवा पोलिस द्वारे प्रदान केलेल्या टोल बूथवर हे उपलब्ध असेल. स्टिकरचा आकार हा ६ इंच आणि आकारात गोल असेल. हे स्टिकर वाहनाच्या समोर आणि मागील बाजूस पेस्ट केले जाऊ शकते. म्हणून आता विशिष्ट कलर कोड असलेल्या गाड्यांनाच रस्त्यावर परवानगी असेल. कलर कोडचा दुरुपयोग केल्यास कलम ४१९ व इतर कलमांतर्गत कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.






