मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – देशात दरदिवशी कोणत्या न कोणत्या कोपऱ्यात महिलांवर अत्याचार, बलात्कार हे सुरूच आहेत यातच महाराष्ट्रातील जळगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
जळगाव येथील पहूर येथे एका सहा वर्षीय चिमुकलीकर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संपू्र्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ही जामनेर तालुक्यातील पहूर येथील रहिवाशी आहे. दरम्यान, पीडिता ही शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास शौचालयासाठी गेली होती. त्यावेळी गावातच राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीने तिला अज्ञात ठिकाणी नेले. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सर्व प्रकार पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली असून पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयिताविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु असून आपल्या मुलींना घराबाहेर पाठवयाचे की नाही? असा प्रश्न आता सर्व पालकवर्गाला पडला आहे.







