रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार कधी थांबणार?

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – देशात सध्या रेमडीसीवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणावर मागणी होत असून रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा देखील अधिक प्रमाणात भासत आहे. यातच, खूप ठिकाणी या रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार काही केल्या कमी नाही होत नाही आहे. अशीच एक घटना बारामतीमध्ये घडली आहे.

अनेक लोकं आपल्या फायद्यासाठी नकली इंजेक्शन विकून कोरोनाबाधित रुग्णांच्या जिवाशी खेळत आहेत. महाराष्ट्राच्या बारामतीमधून अशीच एक बातमी समोर आली आहे. यामध्ये रेमडेसिविर नकली इंजेक्शनच्या गुन्ह्याखाली ४ लोकांना अटक केले आहे.

पुणे ग्रामीणमधील डेप्यूटी एसपी नारायण शिरगांवकर यांनी या घटनेचा खुलासा केला आहे. “चार आरोपींकडून त्यांनी ३ रेमेडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, इंजेक्शनवर रिमडेसिविरचे लेबल लावले गेले होते, परंतु त्यात पेरासिटामॅालचे लिक्विड भरले गेले होते,” असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here