नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात हाहाकार माजवल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील आकडेवारी धक्कादायक असली तरी उत्तरेकडील राज्यांमध्येही अशीच परिस्थिती आहे, मात्र प्रशासन कोरोनाग्रस्तांचे आकडे दाबून ठेवत असल्याचा आरोप होत आहे. असाच धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये पहायला मिळत आहे.
प्रशासनाच्या अधिकृत आकडेवारीनूसार गाझियाबादमध्ये एप्रिल २०२१ मध्ये कोरोनामुळे फक्त २ लोकांना मृत्यू झाल्याची नोंद आहे, मात्र प्रशासन सांगत असलेली आकडेवारी आणि जमिनीवरील परिस्थितीत यामध्ये मोठं अंतर असल्याचं समोर आलं आहे. माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनूसार गाझियाबादमध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.
गाजियाबाद के हिंडन श्मशान घाट पर अंतिम संस्कार के लिए आए शवों को बाहर सड़क किनारे फुटपाथ पर रखकर परिजन अपनी बारी का इंतजार करते दिखे। इसके साथ ही 14 एंबुलेंस कोविड संक्रमित मरीजों के शवों को लेकर श्मशान घाट के बाहर खड़ी हैं।#CoronavirusPandemic pic.twitter.com/eGf0movMXL
— Hindustan (@Live_Hindustan) April 16, 2021
गाझियाबादमध्ये कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू होत असल्याचा दावा केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना स्मशानभूमीमध्ये जागा मिळत नाहीये, त्यामुळे फुटपाथवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ मृतांच्या नातेवाईकांवर आली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतांच्या नातेवाईकांना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाईन लावून वाट पाहावी लागत आहे. यासंदर्भात गाझियाबादमधील हिंडन स्मशानभूमीतील काही फोटो तसेच व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये मृतदेहांना स्मशानभूमीबाहेरील फुटपाथवर रांगेनं झोपवण्यात आलं आहे आणि मृतांचे नातेवाईक आपला नंबर केव्हा येईल याची वाट पाहताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेशात कोरोना विषाणूचा प्रभाव चांगलाच वाढत असल्याचं चित्र आहे. लखनऊ, प्रयागराज, वाराणसी, कानपूर ही राज्यातील महत्त्वाची शहरं कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे सर्वाधिक त्रस्त आहेत. 1 एप्रिल रोजी राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेली 2600 प्रकरणे होती, ती 19 एप्रिल रोजी 28,237 पर्यंत वाढली आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 208523 इतकी आहे.
दरम्यान, गाझियाबादमधील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या नाईट कर्फ्यूच्या वेळेत आता बदल करण्यात आला आहे. रात्रीचा कर्फ्यू रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत लागू करण्यात आला आहे. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे नाईट कर्फ्यूच्या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा फुटपाथवर लोकांवर अंत्यसंस्कार सुरु असल्याचा व्हिडीओ काळजाचा थरकाप उडवणारा आहे. गाझियाबादच्या एका रस्त्याच्या कडेला एकाशेजारी एक काही अंतर राखून सरणं रचलेली या व्हिडीओत पहायला मिळत आहेत. नातेवाईक रस्त्याच्या कडेला असल्याचा या सरणांवरील आपल्या आप्तांना शेवटचा निरोप देत आहेत. स्मशानभूमीत जागा नसल्याने अशाप्रकारे फुटपाथवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या या चिता पेट घेताना तिथं त्यांचे नातेवाईकही दिसून येत आहे. अशाप्रकारे आपल्या प्रियजनांना शेवटचा अग्नीही स्मशानभूमीत मिळत नसल्याचं दुःख त्यांना आहे. कोरोनामुळे परिस्थिती फारच वाईट बनली आहे, मात्र अशाप्रकारे अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत असल्यानं परिसरात हळहळ देखील व्यक्त केली जात आहे.






