एम्स्‌मधील ३८४ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोनाची लागण

पाटणा (बिहार) – कोरोना साथीचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. मंगळवारी पहिल्यांदाच 10,000 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यात कोरोनानं नवीन विक्रम केलाय. दरम्यान, पाटणा एम्समध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचंही चित्र समोर आलंय. एम्समध्ये 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोनाची लागण झालीय.

पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षक (एम्स) म्हणाले की, रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय. बिहारमधील पंचायत निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रकरणात पुढे ढकलण्यात आल्यात. निवडणुकीसंदर्भात अधिसूचना एप्रिल अखेर जारी करण्यात येणार होती, पण आता ती पुढे ढकलण्यात आली. साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवडणुका तहकूब केल्यात आणि 15 दिवसांनंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल व निर्णय घेतला जाईल.

तत्पूर्वी बिहारच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी गेल्या 24 तासांत राज्यात 10,455 कोरोनाबाधित सापडलेत. या दरम्यान 51 रुग्णांनाही आपला जीव गमवावा लागलाय. म्हणजेच, दर तासाला दोन रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडत आहेत. राज्यात नवीन रुग्ण झपाट्याने वाढत असून, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण कमी होत आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सतत कमी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here