आंबेगाव पठारावर डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन तरुणाचा खून

murder-by-axe
file photo

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईनगर येथे बूधवारी रात्री नऊ वाजता एका तरुणाचा डोक्यात कुर्हाडीने वार करून खून केल्याची घटना घडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू असताना हि घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. दरम्यान भारती विद्यापीठ पोलिसांनी हा खून टोळी युद्धातून झाला नसून वैयक्तिक वादातून झाली असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आंबेगाव पठार येथील साईनगर लेन एक येथे एक व्यक्तीचा खून झाल्याची खबर पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाल्यानंतर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय तपासाअंती मृत घोषित करण्यात आले. पोलिसांना मृताची ओळख पडली आहे. हा खून वैयक्तिक वादातून झाला असल्याचे लक्षात घेता भारती विद्यापीठ व गुन्हे शाखेची प्रत्येकी एक पथक आरोपीच्या मागावर गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here