आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या माध्यमातून रामवाडी परिसरातील रोज 200 गरजू लोकांना मोफत जेवण वाटपास सुरूवात.

सोलापूर (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – आज रामवाडी परिसरातील रामवाडी, धोडिंबा वस्ती, येथील रोज गरजू 200 लोकांना मोफत जेवण महानगरपालिका दवाखाना येथे आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यास सुरुवात झाले.

कोरोनाच्या महासंकटामुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. रामवाडी परिसरामध्ये कामगार संख्या व गंवडी कामगार मोठ्या प्रमाणात आहेत.सध्या सोलापूर शहरात संचारबंदी असल्यामुळे सर्व लोकांचे कामधंदा बंद आहेत.अशा परिस्थितीत आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी गरजू गरीब लोकांना शहरात मोठ्या प्रमाणात मोफत जेवण वाटप करत आहे. आजपासून रामवाडी परिसरात 21 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत कोरोनाचे सर्व नियम पाळून मोफत जवण रामवाडी दवाखाना जवळ दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत गरजू लोकांना वाटप करण्यात येणार असल्याचे आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी सांगितले.

solapur-ramwadi-bhojan-watap

यावेळी गणेश डोंगरे,चंद्रकांत नाईक,गोपाळ दोडमनी,तुळशीदास जाधव,देवीदास नाईक,सचिन गायकवाड,रंगनाथ नाईक,राजू शिंदे,कुणाल जाधव,सागर भिसे,विकी आलाट,कुंदन गलांडे,दिनेश डोंगरे, अक्षय पवार,बबलू मकानदार,राजू नाईक,प्रमोद सारवाडकर,सागर जाधव,ओंकार पुला,आकाश नाईक,आरिफ मकानदार तसेच इतर नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here