पुणे (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस श्रीकांतभाऊ दारोळे यांनी पठारे स्टेडियम खराडी येथील शिल्लक असलेल्या बेड गाद्या, उशा या संदर्भात २१ तारखेला facebook live द्वारे माहिती दिली होती सदर गंभीर प्रकार लक्षात येता पुणे शहरतील अनेक पक्ष व संघटणांनी पाठिंबा देत काल पुणे महानगरपालिकेचे सन्मानिय महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन पुण्यातील कोरोना वायरस संदर्भात अनेक विषयांवर चर्चा केली
पुण्यात नुसत्या बेडची नव्हे तर आँक्सिजन बेड ची गरज असून युद्धपातळीवर आँक्सिजन बेड उपलब्ध करण्यासाठी पालिका काम करत आहे पठार स्टेडियम येथे ५० आँक्सिजन बेडचे काम पूर्ण झाले असून लवकरच ते बेड नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येतील असे महापौरांनी सांगितले तसेच रिक्त बेड कुठे व किती शिल्लक आहेत या साठी सुरु असलेली वेबसाईट काम करत नसल्याचे हि श्रीकांत दारोळे यांनी महापौर साहेबांच्या निदर्शनास आणून दिले हि वेबसाइट तात्काळ सुरू करण्यात येईल असे आश्वासन या वेळी महापौरांनी दिले.
पुण्यातील प्रत्येक नागरिकाला बेड उपलब्ध व्हावा त्या सोबत रेमडिसीवर औषधाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे गोरगरिब जनतेची मोठ्या प्रमाणावर लुट होत आहे असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा संगिताताई आठवले यांनी महापौर यांना सांगितले व शक्य तेवढ्या लवकर रेमडिसीवरचा तुडवडा दूर करावे ही मागणी या वेळी करण्यात आली
या भेटीसाठी उपस्थित भिम आर्मी एकता मिशन संस्थापक अध्यक्ष दत्ता भाऊ पोळ, स्वाभिमानी पत्रकार संघच्या वतिने मंगेशभाऊ सोनवणे, क्रांतिविर विचार संघ संस्थापक अध्यक्ष सुनीलभाऊ जाधव,रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना पुणे शहर अध्यक्ष बाळासाहेब पाटोळे हे सर्व मान्यवर उपस्थित होते अशा सामाजिक विषयांवर पाठिंबा दिल्या बद्दल श्रीकांतभाऊ दारोळे यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले






