तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांच्या फडाला शिर्डीतून 1 लाख रुपयाची मदत

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – आज साईबाबांच्या शिर्डी गावातुन तमाशा कलावंत जगला पाहीजे म्हणून शिर्डीमध्ये गेल्या 75 वर्षापासून रामनवमीची परंपरा जपणारे रघुवीर खेडकर यांच्या तमाशा फडातील कलावंत व कामगारांना मदत म्हणून रु.1 लाख रोख स्वरुपात देण्यात आले.

श्रीसाईबाबा हयात असताना स्वतः कलावंताची कदर करायचे व मानधन द्यायचे. श्रीरामनवमी यात्रा कोरोणामुळे यावर्षी देखील रद्द झाली होती. त्यामुळे काल श्रीरामनवमी यात्रा कमेटीचे अध्यक्ष श्री केशवआण्णा गायके पा. यांचे वस्तीवर छोटीशी बैठक घेऊन त्यामधै रघुवीर खेडकर, ज्यांनी गेल्या 4/5 वर्षापासून कधीही मानधनाबाबद रक्कम ठरवित नाही व जे द्याल तो बाबांचा प्रसाद समजुन स्विकारील अशी भुमिका दरवर्षी घेणारे तसेच निस्सिम साईभक्त असल्याने तसेच नुकतेच एका वृत्तवाहिनीवर त्यांची व्यथा व हालअपेष्टा ऐकल्याने सर्वांच्या सहमतीने निर्णय घेण्यात आला की, रामनवमी यात्रेतील मागील 2 वर्षापूर्वीची शिल्लक रकमेतून रु.1 लाख देण्याचे ठरले.

त्याप्रमाणे आज सायंकाळी 6 वा. साईबाबांच्या मंदीरालगत गेट नं.4 जवळ कळसा समोर ही मदत देण्यात आली. यवेळी रघुवीर खेडकर यांनी ही रक्कम नसुन श्री साईबाबांचा प्रसाद असुन आमचे 130 लोकांचे कुटूंबाला मोठा हातभार मिळाला असे बोलताना भावनिक होवुन डोळे भरुन आले व बाबांच्या कळसासमोर नतमस्तक झाले..

याप्रसंगी कोरोणामुळे व नियमांचे पालन व्हावे यासाठी प्रातिनिधीक स्वरुपात फक्त यात्रा कमेटीचे अध्यक्ष केशवआण्णा गायके पा.,शिवसेना नेते कमलाकर कोते, नगराध्यक्ष श्री शिवाजीराजे गोंदकर पा., प्रथम नगराध्यक्ष श्री कैलासबापू कोते पा., भाजपा तालुकाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर आबा गोंदकर पा., गौतम बँकेचे अध्यक्ष श्री बाबासाहेब आप्पा कोते पा. माजी उपनगराध्यक्ष अभयभैया शेळके पा.,माजी उपनगराध्यक्ष श्री सुजित गोंदकर पा., खजिनदार बाळासाहेब लुटे व प्रमोद गोंदकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here