पावणेदोन लाखांना १५ दिवसांचे बाळ विकणाऱ्या पित्याला पोलिसांनी केली अटक

बलिया (उत्तर प्रदेश) – येथे राहणाऱ्या एका इसमाला बिकट परिस्थितीमुळे आपल्या पंधरा दिवसांच्या अपत्यालाच विकण्याची वेळ आली. तथापि, या कारणावरून पोलिसांनी या पित्यासह अन्य तीन जणांना अटक केली आहे.

संतोष राम असे या पित्याचे नाव आहे तो रुदालपूर गयाघाट गावचा रहिवासी आहे. या प्रकरणी सदर मुलाच्या आईने आपल्या पतीच्या विरोधात पोलीस तक्रार दिल्याने पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली. या पित्याने रौसिंगपूर गावात राहणाऱ्या जितेंद्रकुमार यादव नावाच्या इसमाला आपले हे अपत्य 1 लाख 45 हजार रुपयांमध्ये विकले.

लालबहादूरसिंग नावाच्या एका मध्यस्थामार्फत हा व्यवहार झाला. या प्रकरणात गुधियादेवी या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत सदर बालकाला ताब्यात घेऊन आईच्या हवाली केले आणि या प्रकरणातील 1 लाख 23 हजारांची रक्कम जप्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here