हिंगणघाट (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हिंगणघाट मध्ये लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी SDO कार्यालय हिंगणघाट येथे लसीकरण संदर्भात बैठक संपन्न झाली होती. त्या बैठकीमध्ये आमदार समीर कुणावार यांनी लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी केली होती ती आज पूर्ण झाली असून आज दिनांक 26-04-2021 सोमवार पासून जी बी एम एम हायस्कूल हिंगणघाट येथे नवीन लसीकरण केंद्र सुरू झाले आहे.

या कोरोना महामारीमध्ये लसीकरण करणे फार महत्त्वाचे आहे लसीकरण शिवाय पर्याय नाही, लसीकरण जास्तीत जास्त हिंगणघाट मध्ये झाली पाहिजे अशी इच्छा आहे म्हणून यासाठी प्रयत्न करतो आहे. याकरिता जास्तीत जास्त जनतेने लसीकरनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी जनतेला केले.
या उद्घाटन प्रसंगी आमदार समीरभाऊ कुणावार, हिंगणघाट शहराचे लोकनिर्वाचित नगराध्यक्ष मा. प्रेमबाबू बसंतानी, हिंगणघाट चे SDO श्री. चंद्रभानजी खंडाईत साहेब, तहसीलदार श्रीरामजी मुंधडा,हिंगणघाट न. प. मुख्याधिकारी मा. श्री. अनिलजी जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सौ. कीर्तीताई कुचेवार, समाज सेवक संजयजी बोत्रा , समाज सेवक जेठानंदजी राजपूत, पत्रकार आसिफ कूरेशी किरणजी वैद्य. इत्यादी सर्व मान्यवर मंडळी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.



