औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – शहरात विविध ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिस विभागाकडून कारवाई सुरू आहे. शहरात मुकुंदवाडी भागात तीन, तर जवाहरनगर भागात एक अवैध दारू विक्रेत्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली.
प्रशांत दिलीप सातदिवे (रा. आनंदनगर याला मुकुंदवाडी मंडीच्या बाजूला मोकळ्या जागेत अवैधरित्या दारू विक्री करताना ताब्यात घेण्यात आले. भरत बाबुराव बनारसे (रा. रेल्वे गेट, मुकुंदवाडी) याला रेल्वे गेट जवळ दारू विक्री करताना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच प्रमोद भागवत अंबाड रा. जयभवानीनगर याच्या ताब्यातून विक्रीसाठी आणलेली अवैध देशी दारू ताब्यात घेण्यात आली आहे. या तिन्ही प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.






