नदीपात्रात मातीचे उत्खनन करतांना दरड कोसळून १ मजूर ठार, ३ जखमी

अकोला (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) – जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातील सोनाळा ( पूर्णा ) येथे नदीपात्रातून मातीचे उत्खनन करताना दरड कोसळल्यानंतर मातीखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला, तर इतर तीन मजूर जखमी झाले आहेत. ही घटना काल गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. मृत्यू झालेला ३९ वर्षीय मजूराचे नाव मोहम्मद झाकीर अब्दुल शाबीर कुरेशी असे आहे. हा मजूर बाळापूर शहरातील आजमपुरा कासारखेड भागातील राहणारा होता.

बाळापूर तालुक्यात लॉकडाऊनमध्ये खनिजाचे उत्खनन मोठ्या जोमाने सुरु असून तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम सोनाळा येथील पूर्णा नदीपात्रातही मातीचे उत्खनन सुरू आहे. या उत्खनानादरम्यान मोहम्मद कुरेशी याच्या अंगावर दरड कोसळल्यामुळे त्याच्या डोक्यात जबर मार लागला आणि त्याचा जागीच मुत्यू झाला. या घटनेत जखमी झालेल्या मजुरांची नावे समजू शकलेली नाहीत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेत मृत पावलेला मजूर कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असल्याने त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. लॉकडाऊनमुळे काम उपलब्ध नसल्याने अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर. काहींचे काम बंद असल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी मागील काही दिवसापासून हे मजूर उत्खनानाच्या कामावर जात आहेत. याच्या पाठीमागे त्याच्या परिवारात अहमद याला चार मुले, पत्नी असून घरातील कमविता माणसाचे दुर्दैवी निधन झाल्याने या परिवारावर संकट कोसळले आहे. सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे .या घटनेचा बाळापूर आणि उरळ पोलिस अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here