तरुणाने स्वतःच्याच बापाच्या हत्येसाठी दिली 10 लाखांची सुपारी

murder

लखनऊ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसैन) – उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. प्रेम हे आंधळं असतं, मात्र याच प्रेमात बापाची हत्या करणं हे धक्कादायक आहे. अशीच एक घटना मेरठ येथे उघडकीस आली आहे. एका मुलाने आपल्याच बापाच्या हत्येसाठी तब्बल 10 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं उघड झालं आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच चर्चा रंगली आहे.

मेरठ येथील ध्यानचंद परिसरात कोळशाचे मोठे व्यापारी अरुण जैन राहतात. त्यांना एक सुपुत्र आहे. त्याचं नाव आयुष जैन असं आहे. आयुषचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत आणि त्याला तिच्याशीच लग्न देखील करायचं आहे. मात्र, अरुण यांना आयुषचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत करायचं होतं. यामुळे बाप लेकामध्ये सतत वाद होत होता. या वादातून आयुष संतापला आणि त्याने आपल्याच बापाला संपवण्यासाठी 10 लाख रुपयांची सुपारी दिली.

ऑफिसमध्ये असताना 3 अज्ञात व्यक्ती आपला चेहरा झाकून अरुण यांच्या ऑफिसमध्ये घुसले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये अरुण यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच चौकशी दरम्यान अरुण यांच्या हत्येसाठी त्यांच्याच मुलाने 10 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं समोर आलं. दरम्यान, पोलिसांनी मुख्य आरोपी आयुष सोबत आणखी तीन जणांना अटक केली आहे. तसेच याबाबत व्यवस्थित कारवाई करण्यात येईल, असं देखील यावेळी पोलीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here