माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं करोनानं निधन

नवी दिल्ली – ‘पद्म विभूषण’ सन्मानित देशाचे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं शुक्रवारी निधन झालंय. मृत्यूसमयी ते ९१ वर्षांचे होते. करोना संक्रमित आढळल्यानंतर सोली सोराबजी यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सोली सोराबजी यांचं पूर्ण नाव सोली जहांगीर सोराबजी असं होतं. त्यांचा जन्म १९३० साली मुंबईत एका पारसी कुटुंबात झाला होता. सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं.

१९५३ सालापासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस सुरू केली होती. ते १९७१ साली सर्वोच्च न्यायालयाचे सीनिअर काऊन्सिल बनले होते.१९७७ – १९८० पर्यंत त्यानी देशाचे सॉलिसिटर म्हणून काम पाहिलं. त्यानंतर देशाचे अॅटर्नी जनरल या पदाची जबाबदारी हाताळण्याची संधी त्यांना दोन वेळेस मिळाली. पहिल्यांदा सोराबजी यांनी १९८९ ते १९९० पर्यंत ‘भारताचे अॅटर्नी जनरल’ म्हणून जबाबदारी हाताळली त्यानंतर पुन्हा एकदा १९९८ ते २००४ पर्यंत त्यांनी या पदाची सूत्रं सांभाळली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here