लसीकरण केंद्र व कोवीड सेंटरमधील रुग्णांना कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्र लसीचा सध्या तुटवाडा जाणवत असून लवकरच सर्वांना लसी उपलब्ध करून दिल्या जातील जळगाव जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रोज लसीकरण केंद्र व कोवीड सेंटरला भेटी देऊन नागरिक, ग्रामस्थ, रुग्णांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना सहकार्य करायचे आदेश जिल्ह्याचे पालक मंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबरावजी पाटील यांनी दिले आहेत.

दि. ३० एप्रिल रोजी धरणगाव येथील लसीकरण केंद्रावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील सर यांनी भेट देऊन तेथील आरोग्य कर्मचारी डॉक्टर मोनाली देसाई, पोलिस कर्मचारी होमगार्ड समाधान पाटील यांच्याशी चर्चा करून ज्येष्ठ नागरिक दिव्यांग यांना प्राधान्य देऊन व सोशल डिस्टिंगशनचा पालन करून सहकार्य करावे

याप्रसंगी धरणगाव तालुका काँग्रेसचे रतिलाल चौधरी,शिवसेना उपप्रमुख रवींद्र जाधव,युवासेनेचे कमलेश बोरसे,योगेश पाटील,बंटी पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here