धरणगाव पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांची नियुक्ती

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव येथील पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांची अमळनेर पोलीस स्टेशनला प्रभारी पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असून धरणगाव येथे अंबादास मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील सर,नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना बुके देऊन सत्कार केला व धरणगाव तालुक्यात सह शहरात कोवीड 19 विषाणू रोखण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे व कडक निर्बंध घालून नियमांचे उल्लघन करण्यावर कडक कारवाई केल्याशिवाय कोवीड-19चा नायनाट होणार नाही असे ही पीएम पाटील सर व नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here