जळगांव (जिल्हा प्रतिनिधी चित्रा चौधरी) – फैजपूरच्या उपनगराध्यक्षा सौ नयना चौधरी यांचे पती व सहकार क्षेत्रात गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत असणारे सातपुडा पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन तथा यावल शेतकी संघचे माजी चेअरमन चंद्रशेखर देविदास चौधरी यांची यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या तज्ज्ञ संचालकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल आमदार शिरीषदादा चौधरी, जि.प. गटनेते प्रभाकर सोनवणे, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, फैजपूरच्या नगराध्यक्षा सौ.महानंदा होले, नगरसेवक बापू वाघुळदे, जळगाव दूध संघाचे संचालक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेते कलीम मन्यार, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, डॉ.सतीश चौधरी, हेमंत चौधरी, आशा अग्रवाल यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी बुलंद पोलीस टाइम्सच्या प्रतिनिधीशी बोलतांना चंद्रशेखर चौधरी यांनी सांगितले की, मी ग्रामीण भागातील असल्याने, येथील काळ्या मातीशी माझी नाळ जुळलेली आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांची मला जाणिव असून, त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहील.






